परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’
‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’
‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’
‘जे हिंदु धर्मावर टीका करतात, त्यांच्यासारखे अज्ञानी या जगात कोणी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर सनातन प्रभातमध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’