सद्गुरूंच्या आशीर्वादाचे महत्त्व

प.पू. दास महाराज

‘पैसे अशाश्‍वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे. तो कधीच भंग होत नाही आणि लोपही पावत नाही. समर्थ रामदास स्वामी यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथील परिषदेत हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले. हे त्यांच्या सद्गुरूंच्या आशीर्वादानेच झाले. सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प केला आहे. सद्गुरूंच्याच आशीर्वादाने धर्माचे कार्य होते; म्हणून सद्गुरूंच्या आशीर्वादाला महत्त्व आहे.’
– प.पू. दास महाराज (२८.११.२०२०)