परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले . . . यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले         

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले

हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना अधोगतीला नेणारा सर्वधर्मसमभाव !

‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्‍या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्‍या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कलियुगातील मानवाकडून नाही, तर देवाकडून निवडले जावे’, अशी साधकांची इच्छा असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले