परमेश्‍वर सर्व विश्‍वाची जबाबदारी घेतो, तरी माणसाला त्याची जाणीव नसणे

‘अनंतरूपी परमेश्‍वर हा माणसांच्या कित्येक मोठ्या जबाबदार्‍या उचलत असतो. भयंकर अडचणी दूर करून माणसाला वाट सुकर करून देतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सुनेचे पाय धरल्यामुळे पुण्य सासूला मिळणे; पण सुनेची अधोगती होणे

‘पोरी, सुनेचे पाय धरलेस, तर काही वाईट वाटण्याचे कारण नाही. योग्य केलेस. पाय धरलेस ते तुझ्यात चांगुलपणा असल्याने. ते परमेश्‍वराचे पाय धरल्यासारखे झाले. पाय तिचे; पण पुण्य तुझ्याकडे आले आणि तिला आणखी अधोगती आली.’ – प.पू. आबा उपाध्ये

वर्षारंभी सत्त्वगुणी समाजबांधवांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करा !

‘सध्या समाज, राष्ट्र आणि विश्‍व यांच्यावर कोरोना साथीचे संकट ओढवले आहे. काही काळापूर्वी देशभर पेटलेल्या दंगली, धार्मिक विद्वेष आणि देशविरोधकांचे ऐक्य, तसेच आता उद्भवलेली विषाणूची साथ या स्थुलातून दिसणार्‍या घटना भावी भीषण संघर्षाचे आव्हान सांगणार्‍या आहेत.