विज्ञानाची निरर्थकता !
मानवाला माणुसकी न शिकवणाऱ्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणाऱ्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !
मानवाला माणुसकी न शिकवणाऱ्या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणाऱ्या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे !
‘व्यक्तीगत प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम करून पहा. त्यात अधिक आनंद आहे !’
सनातनच्या आश्रमांमध्ये सर्वजण साधना करण्यासाठी ‘साधक’ या नात्याने रहात असल्यामुळे एका आश्रमात २००-२५० जण रहात असले, तरी कुणामध्येही भांडणे होत नाहीत. सर्वजण आनंदाने रहातात आणि एकमेकांना साहाय्य करतात.’
‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’
‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकीय पक्ष ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणाऱ्या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’
‘हिंदु (ईश्वरी) राष्ट्रात ‘नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हेही शिकवले जाईल.’
‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले