परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !
‘आपण जे काही करणार आहोत, ते आपल्या आतील भगवंताला सांगावे, म्हणजे तो सर्व पार पाडेल. आपला मालक भगवंत आहे. त्याला विचारूनच सर्व केले पाहिजे. मनाने केल्यास अडचणी येतात आणि चिडचिड होते. भगवंताच्या संपर्कात राहिल्यास काहीही अडचणी येत नाहीत. ‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’
– परात्पर गुरु पांडे महाराज, (१.८.२०१४)