महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी आणि मुजोरीपणा यांमुळे जनता मेटाकुटीस ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महाराष्ट्रात विकास होईल अशी आशा जनतेला आहे; मात्र विकास करण्याचे दायित्व ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यात अथवा कारनाम्यात लिप्त आहेत.

चंद्रपूर येथे पंतप्रधान मोदी यांच्या फलकाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले;  तिघांना अटक

काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळात किती महागाई वाढली हे पाहिले आहे का ? काँग्रेसजनांनी केलेल्या कुकृत्याचा पाढा इतका न संपणारा आहे की, त्यांच्या नेत्यांना सततच तोंड काळे करून फिरावे लागेल !

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अपप्रकार होऊ नये म्हणून बजरंग दलाची मिरज शहर आणि ग्रामीण भागात पहारा पथके !

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कार्यकर्ते सातत्याने पहारा देत असल्याने कोणताही अनुचित प्रकार दिसून आला नाही. पोलिसांनीही यंदा शहर परिसर, दंडोबा डोंगर येथे दामिनी पथके सिद्ध ठेवली होती.

नगरपालिका उपाध्यक्ष हाजी रशीद यांसह ६ जणांना अटक

तलवारी नाचवण्याची मुजोरी धर्मांधांमध्ये किती प्रमाणात आहे, हेच यावरून लक्षात येते. ही मुजोरी नष्ट करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार ? केवळ अटक होऊन असे प्रकार थांबणार नाहीत. पोलिसांनी यासाठी केलेली कडक कारवाई सर्वांना सांगितली पाहिजे !

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी नितीन शिंदे, तर सरचिटणीसपदी किशोर पाटील बिनविरोध

या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सरचिटणीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये अधिवक्ता रचना भालके यांची निवड करण्यात आली.

(म्हणे) ‘मला आणि माझे वडील फारूख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे ! – ओमर अब्दुल्ला यांचा सामाजिक माध्यमातून दावा

राष्ट्रघातक्यांना आणि हिंदुद्वेषींना आजन्म नजरकैदेत ठेवले पाहिजे

इतिहास रचणारे भारतीय !

रश्मी सामंत नावाच्या ऑक्सफर्ड येथे शिकणार्‍या भारतीय विद्यार्थिनीने एक अनोखा इतिहास रचला आहे. ती ‘ऑक्सफर्ड स्टुडंट युनियन’च्या अध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. अशी निवड होणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. तिच्या चमूत अन्य काही भारतीय मुलेही निवडून आली आहेत.

विवादित निर्णय देणार्‍या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यास महाराष्ट्र शासनाचा नकार !

विवादित निर्णय देणार्‍या न्यायमूर्तींना १ वर्षाची मुदतवाढ दिली असतांना या काळात त्यांनी दिलेल्या निर्णयांची पडताळणी व्हायला हवी, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई पोलिसांची भिकार्‍यांना पकडण्याची मोहीम

प्रत्येक जण त्याच्या प्रारब्धानुसार वागत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भिकार्‍यांनाही साधना सांगितली, तर त्यांचे प्रारब्ध हळूहळू न्यून होऊ शकते. त्यामुळे त्यांना काम देणे आणि साधना सांगणे, यातूनच भिकार्‍यांची संख्या न्यून होऊ शकते.

बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते.