मलकापूर येथे तलवारी नाचवल्याचे प्रकरण
तलवारी नाचवण्याची मुजोरी धर्मांधांमध्ये किती प्रमाणात आहे, हेच यावरून लक्षात येते. ही मुजोरी नष्ट करण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार ? केवळ अटक होऊन असे प्रकार थांबणार नाहीत. पोलिसांनी यासाठी केलेली कडक कारवाई सर्वांना सांगितली पाहिजे !
मलकापूर (जिल्हा बुलढाणा) – १० फेब्रुवारी या दिवशी येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या पटांगणावर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते हाजी रशीद खा जमादार यांचा वाढदिवस आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी नाचवून नारेबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हाजी रशीद यांसह नगरसेवक अधिवक्ता जावेद कुरेशी आणि इतर ४ कार्यकर्ते यांना ११ फेब्रुवारी या दिवशी अटक केली. या आरोपींना न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या वाढदिवसाला जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. वाढदिवशी रशीद यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघनही केले होते. तलवारी नाचवतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.