काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळात किती महागाई वाढली हे पाहिले आहे का ? काँग्रेसजनांनी केलेल्या कुकृत्याचा पाढा इतका न संपणारा आहे की, त्यांच्या नेत्यांना सततच तोंड काळे करून फिरावे लागेल !
चंद्रपूर – ११ फेब्रुवारी या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील घुग्गूस येथे बैलबंडी आणि दुचाकी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसच्या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी शहरातील पेट्रोल पंपासमोरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळे फासले. या प्रकरणी काँग्रेसच्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. युवक काँग्रेसचा सचिव सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, निखील पुनघंटी अशी या अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. या वेळी या कार्यकर्त्यांनी ‘मोदी शासन मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. सामाजिक माध्यमांत हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले होते.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक