मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामास प्रारंभ !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुढील ४५ दिवस दर्शनासाठी बंद रहाणार असून प्रतिदिन ५ घंटे केवळ मुखदर्शन होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू !

लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग  मतदारसंघासाठी ७ मे २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

गोवा : अराजकता माजलेल्या बंगालमध्ये ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करा !

बंगालमध्ये हिंदु समाज जीव मुठीत धरून जगत आहे. बंगालमध्ये हिंदूंचे दमन रोखण्यासाठी पश्चिम बंगालचे राज्य सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून केली.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोवा मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी घेतली पत्रकार परिषद

‘‘लोकसभेच्या मागील निवडणुकीत गोव्यात १ सहस्र ६२२ मतदार केंद्रे होती. यंदाच्या निवडणुकीत उत्तर गोव्यात ८६३, तर दक्षिण गोव्यात ८६२ अशी एकूण १ सहस्र ७२५ मतदान केंद्रे असणार आहेत.’’ राज्यात २१८ ‘मॉडेल’ मतदान केंद्रे असतील.

ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोव्यात दिवाळी आणि नाताळ सणांच्या वेळी फटाके उडवण्यावर वेळेचे निर्बंध !

राज्य सरकारने ही कृती योजना नुकतीच अधिसूचित केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने या अधिसूचनेत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ध्वनीप्रदूषण नियमांचे कठोरतेने पालन होत आहे कि नाही ? हे पहाण्यास सांगितले आहे.

लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून आणि गाज फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’चे आयोजन !

लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योद्ध्यांसमवेत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराचा जागर करण्याचा, तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.

सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत ! – मनमोहन वैद्य, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे.

परिवहन विभागाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने ‘ॲप’द्वारे सेवा देणार्या ‘टॅक्सी’ गायब !

परिवहन विभागाने नेहमीच अशी भूमिका घेणे आवश्यक आहे !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.