भररस्त्यात महाआरती परवडणार आहे का ? मग नमाज कसा चालेल ? – आमदार नीतेश राणे, भाजप

देहलीच्या पोलीस अधिकार्‍याने नमाजपठण करणार्‍यांवर कारवाई केली म्हणून टीका केली जात आहे. भररस्त्यात हिंदूंनी महाआरती केली, तर परवडणार आहे का ? मग भररस्त्यात नमाज कसा चालेल ? असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी घाटकोपर येथील हिंदू जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक यांच्या माध्यमातूनही अध्यात्मप्रसार अन् धर्मप्रसार !

संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !

पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !

कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’

राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे

येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.

पेठवडगाव येथील विकासाच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा अर्ज फेटाळला !

शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करतांना नदीची वाहन क्षमता अल्प होता कामा नये. नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, तसेच पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी.

जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून ४३ कोटींचा निधी उपलब्ध !

राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून राज्य शासनाने तो वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

गोवा : हरवळेतील पारंपरिक दिवजोत्सव आणि रथोत्सव रहित !

हिंदूंसाठी असे होणे दुर्दैवी ! हिंदूंनी सामंजस्याने समस्या सोडवणे आवश्यक !

डिझेल परताव्यापोटी रत्नागिरी जिल्ह्याला ७ कोटी ७३ लाख रुपये संमत

राज्यशासनाने जिल्ह्यासाठी डिझेल परताव्यापोटी ७ कोटी ७३ लाख १४ सहस्र रुपये संमत केले आहेत. त्यामुळे येथील मासेमारांना दिलासा मिळाला आहे.