एच्.डी. रेवण्णा यांना अटक, तर प्रज्वल यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला !

अशा पिता-पुत्र राजकारण्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Terror Attack in Poonch: पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा, तर ४ जण घायाळ !

जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकच्या अस्तित्वामुळेच ही आतंकवादी आक्रमणे होत असून त्याचा संपूर्ण नि:पात करणे, हाच यावरील मूलगामी उपाय आहे, हे लक्षात घ्या !

Saddam Hussein stabbed police: दलित मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सद्दाम हुसेनने पोलीस निरीक्षकावर केला चाकूने वार !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ची आरोळी ठोकणारे आता या प्रकरणी काय बोलणार आहेत ?

Rahul Slams PM Modi: (म्हणे) ‘द्वारकेत समुद्राखाली जातांना तो किती घाबरला होता !’ – राहुल गांधी

पंतप्रधानांवर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने गांधी त्यांचीच पत दाखवून देत आहेत !

Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे.

Youth Beaten by Mob: पंजाबमध्ये जमावाने बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू !

पंजाबमधील फिरोजपूर येथील बाबा बीर सिंह गुरुद्वारामध्ये ठेवलेल्या  गुरुग्रंथसाहिबची काही पाने फाडल्याचा आरोप करत बक्षीस सिंह नावाच्या १९ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. जमावातील काही जणांनी आरोपी तरुणावर तलवारीने वार केले.

कोकणचा विकास पर्यटनातून शक्य ! –  राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

कारसेवकांना गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून दिली. तो बाबर आणि त्याला सांभाळणारे आजही आपल्याकडे आहेत, हे दुर्दैव आहे.

एरंडोली (सांगली) येथे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

हेलिकॉप्टर नाशिकहून बेळगावकडे जात असतांना त्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने येथे लँडिंग करण्यात आले.

दबावतंत्र असते तर संजय राऊतही भाजपमध्ये आले असते ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

पुणे येथे पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते. विनोद तावडे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते.

आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून सभेला न जाण्याच्या नोटिसा ! – डॉ. अमोल कोल्हे

करंदी या गावातील ‘महाविकास’ आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमांतून सभेला जाऊ नये, अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, असा आरोप ‘महाविकास आघाडी’चे लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.