गेल्या ६ महिन्यांत पूंछमध्ये तिसरे आक्रमण !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील पूंछ भागात ४ मेच्या सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक सैनिक हुतात्मा झाला, तर किमान ४ सैनिक घायाळ झाले. हुतात्मा झालेल्या सैनिकाचे नाव कॉर्पोरल विक्की पहाडे असून ते भारतीय हवाईदलात कार्यरत होते.
पूंछ येथील सुरनकोट भागात संरक्षणयंत्रणांच्या दोन गाड्या रस्त्यावरून जात असतांना ४ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. दोनपैकी एक गाडी ही भारतीय हवाईदलाची होती. आक्रमण केल्यावर आतंकवादी जंगलात पळून गेले. स्थानिक पोलीस आणि संरक्षण यंत्रणा आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत. पूंछ हा राजौरी-अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येत असून तेथे २५ मे या दिवशी मतदान होणार आहे.
पूंछ भागात गेल्या अडीच वर्षांत एकूण ६ आतंकवादी आक्रमणे झाली असून यांत २१ सैनिक शहीद झाले आहेत, तर गेल्या ६ महिन्यांत हे तिसरे आक्रमण आहे.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादाचा निर्माता पाकच्या अस्तित्वामुळेच ही आतंकवादी आक्रमणे होत असून त्याचा संपूर्ण नि:पात करणे, हाच यावरील मूलगामी उपाय आहे, हे लक्षात घ्या ! |
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani