पिंपरी (पुणे) – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी दत्तक घेतलेल्या करंदी या गावातील ‘महाविकास’ आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमांतून सभेला जाऊ नये, अशा नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, असा आरोप ‘महाविकास आघाडी’चे लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या वेळी डॉ. कोल्हे यांनी हा आरोप केला आहे. डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल, तर आढळराव यांना पराभव स्पष्ट दिसून येत आहे. दडपशाही आणि सत्तेचा उपयोग करून ‘महाविकास’च्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे.’’