ई-पास नसल्यास गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी;

महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध नाहीत

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भात अफवेवर विश्‍वास ठेवू नका ! – पंतप्रधान मोदी

कोरोना महामारीच्या या काळात लसीला किती महत्त्व आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्‍वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून सर्व राज्य सरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे

आम्ही भारतीय आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार ! – अमेरिकेला उपरती

लवकरच आम्ही भारतातील नागरिक आणि तेथील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी अतिरिक्त साहाय्य पाठवणार आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे.

यादगिरी (कर्नाटक) येथे खाटा नसल्याने कोरोनाबाधिताला भरती करून घेण्यास नकार

या पूर्ण प्रकरणातून रुग्णालयांचा जनताद्रोही कारभार लक्षात येतो. अशा घटना घडत असतांना कर्नाटक शासनाने त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

कोरोना संसर्गामुळे नैराश्यात गेलेल्या महिला डॉक्टरची आत्महत्या !

उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील सूरजपूर स्थानक परिसरात कोरोना संसर्ग झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.

भूमी संमत करण्यासाठी निवृत्त सैनिकाकडून लाच मागणार्‍या महसूल निरीक्षकाला अटक

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

कर्नाटकातील देवस्थानाच्या कर्मचार्‍याकडून अर्पण पेटीतील धनाची चोरी

धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या या मंदिरातील भक्तांनी दिलेले अर्पण एक कर्मचारी अर्पण पेटीतून लुटत असल्याचे एका स्थानिकाने त्याच्या भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करून पकडून दिल्याची घटना घडली.

उडुपी शिरूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून १६ वर्षीय अनिरुद्ध सरलाथैया यांची निवड !

धर्मस्थळातील निदले गावात रहाणारे १६ वर्षांचे अनिरुद्ध सरलाथैया यांचा उडुपीच्या ८ मध्व मठांपैकी श्री शिरुर मठाचा ३१ वा वारस म्हणून अभिषेक करण्यात येणार आहे. अनिरुद्ध सरलाथैया यांचा औपचारिक विधी १४ मे या दिवशी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे श्री सोडे मठ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

हिंदूंच्या यात्रांवर लावला जाणारा कर टाळण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – श्री नीलमणिदास महाराज

सत्संगातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणे आवश्यक आहे. सर्वांना धर्मशिक्षण देऊन हिंदु राष्ट्रासाठी एक प्रस्ताव सिद्ध करून प्रत्येक ग्रामपंचायतीद्वारे त्याचा ठराव संमत करायला हवा आणि तो सरकारला पाठवला पाहिजे.

औषधोपचार न केल्यानेे संतप्त कोरोनाबाधित पतीकडून पत्नीची हत्या !

कोरोनाबाधित पतीला पत्नीने घरातील सज्जामध्ये (गॅलरीमध्ये) ३-४ दिवस ठेवले होते. तिने पतीला औषधोपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे नेले नव्हते. याचा राग अनावर होऊन त्याने २४ एप्रिल या दिवशी तिच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिची हत्या केली.