भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी,  राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करतांना झालेल्या दुर्घटनेत ८ जण ठार

एका नौकेद्वारे कॅनडातून अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या २ कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भारतियांचाही समावेश आहे.

महावितरणच्या माजी अभियंत्याकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

राज्यात वीज दरवाढ होण्याचे संकेत असतांना प्रस्तावित वीज शुल्कवाढीला महावितरणचे माजी अभियंता अजित देशपांडे यांनीच छत्रपती संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून आव्हान दिले आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर निर्णय लवकरच ! – केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सांस्कृतिक विभाग सकारात्मक आहे. मराठी भाषेला गौरवशाली आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मराठी भाषांचे शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख, पुरातन साहित्य आणि वस्तू पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत.

(म्हणे) ‘महाराष्ट्रातील दंगलींना सनातनी कट्टरतावाद कारणीभूत !’ – जितेंद्र आव्हाड

इस्लामी धर्मांधांच्या हिंसाचाराचे खापर हिंदूंवर फोडण्याची एकही संधी न सोडणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हितेश जानी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आज वाशी येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ !

भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ एप्रिल या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील ब्लू डायमंड हॉटेल येथून या गौरव यात्रेचा प्रारंभ दुपारी २ वाजता होणार असून सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे, अशी माहिती आमदार गणेश नाईक यांनी दिली.

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.

सिक्कीममध्ये भूस्खलनात सापडले ६ सैनिक  

भारतीय सेना दलाच्या सैनिकांना प्राणाची बाजी लावून अजय ढगळे आणि अन्य ५ सैनिकांना शोधून काढले. अजय ढगळे पार्थिव ३ एप्रिल या दिवशी मोरवणे गावी आणण्यात येणार आहे.

सावरकरांचे विचार तळागाळांत पोचवून सकारात्मक पद्धतीने काँग्रेसला विरोध करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीतील छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेला प्रारंभ होणार असून जेलनाक्यामार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोचणार आहे.