दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक घोषित !

८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षांचे दिनांक घोषित करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

मुंबई शहरातील काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साह होता; पण आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी आदी मुसलमानबहुल विभागांमध्ये मतदान तुलनेत अधिक प्रमाणात झाले.

सामूहिक ‘आमरण उपोषणा’च्या सिद्धतेला लागा ! – मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

विधानसभा निवडणूक संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षणासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यभरातील कारागृहात ७९ टक्के कच्चे बंदीवान !

राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान ठेवण्यात आले असून यामध्ये तब्बल ७९ टक्के कच्चे बंदीवान (न्यायाधीन बंदीवान) आहेत. या बंदीवानांच्या विरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. उर्वरित २१ टक्के बंदीवान गुन्ह्यात दोषी आढळल्यामुळे शिक्षा भोगत आहेत.

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदी देवस्थानाची सिद्धता अंतिम टप्प्यात !

कार्तिकी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून आळंदीत येणार्‍या भाविकांना दर्शन मंडपात खिचडी प्रसाद, चहा, केळी आणि पिण्याच्या पाण्याची सेवा विनामूल्य दिली जाणार आहे. भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि मंदिर परिसरात चोर्‍या होऊ नये, यासाठी देवस्थानाच्या व्यवस्थापनाने ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

मतदार केंद्रांच्‍या संख्‍येत वाढ करणे आदी उपाययोजना केल्‍यामुळे मतदानाच्‍या टक्‍केवारीत वाढ ! – एस्. चोक्‍कलिंगम, मुख्‍य निवडणूक अधिकारी

वर्ष २०१९ च्‍या तुलनेत या वर्षी राज्‍याच्‍या विधानसभा निवडणुकीच्‍या मतदानामध्‍ये साडेतीन टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली. म्‍हणजे राज्‍यात काही लाख मतदान वाढले.

आचारसंहितेच्‍या काळात महाराष्‍ट्रात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांचे अमली पदार्थ, मद्य आणि मौल्‍यवान वस्‍तू जप्‍त !

समाजद्रोह्यांना निवडणूक आयोगाचा जराही धाक वाटत नसल्‍यानेच ते अशा प्रकारचे कृत्‍य करू धजावतात.

कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुपा प्रसार करण्याचा प्रयत्न  !

खरे तर अशा अपप्रकारांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. हिंदुत्वनिष्ठांनी जर हे उघड केले नसते, तर हा प्रकार चालूच राहिला असता. त्यामुळे प्रशासनातील संबंधित उत्तरदायींवरही कारवाई झाली पाहिजे !

नवी मुंबई येथील विमानतळाजवळील अवैध दर्गा पाडला !

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’च्या (सिडको) भूमीवर अवैधरित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने पाडली.

हिंदूंना आता कुणी छेडले, तर ते सोडणार नाहीत ! – पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री

बागेश्‍वरमधील हे जागृत हिंदू वर्ष २०२४ चे जागृत हिंदू आहेत. ‘जे थप्‍पड मारल्‍यावर पळून जात होते’, असे हिंदू ते राहिलेले नाहीत.