न्यायालयाने ठोठावली २४९ वर्षांची शिक्षा !
डार्विन (ऑस्ट्रेलिया) – येथे ४० श्वानांवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणी अॅडम ब्रिटन नावाच्या ‘मनुष्यप्राण्या’ला न्यायालयाने २४९ वर्षांची अत्यंत कठोर शिक्षा ठोठावली. ब्रिटन याच्याविरुद्ध प्राण्यांवरील अत्याचारांच्या प्रकरणी एकूण ६० गुन्हे नोंद आहेत. यामध्ये ४२ श्वानांचा छळ केल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मागच्या वर्षी ६० प्रकरणांत त्याच्यावरील दोषारोप सिद्ध झाले होते. या नराधमाने स्वतःच्या या किळसवाण्या कृत्याचे व्हिहिओही बनवले होते. या प्रकरणी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ग्रँट यांनी निकाल दिला.
British Zoologist Adam Britton’s bestial act : Rapes and kills 40 dogs
Court hands down 249 year sentence
In the past many incidents of rape of cows by religious fanatics, and now rape of dogs by a Christian Adam Britton have come to light.
Contrary to this, in Hindu Dharma,… pic.twitter.com/PJOF0kM5S6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2024
अॅडम ब्रिटन याच्या मानसिक स्थितीचा केला जात आहे अभ्यास !
प्राण्यांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणार्या मानवी प्रवृत्तीसाठी ‘झूफिलिया’ हा शब्द, तर प्राण्यांवर होणार्या बळजोरीकरता ‘बेस्टीयालिटी’ हा शब्द वापरला जातो. आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखवणे अवैध आहे. अनेक देशांत प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे आहेत. तथापि ज्या देशांमध्ये ‘झुफिलिया’ या प्रकारावर बंदी नाही, अशा ठिकाणी अशा किळसवाण्या कृत्याचे चित्रण केले जाते आणि जगभरात त्याचे वितरण होते. अॅडम ब्रिटन याच्यावर बेस्टीयालिटी प्रकरणीही गुन्हे नोंद असून त्याच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे.
संपादकीय भूमिकायापूर्वी अनेक धर्मांध मुसलमानांनी गायींवर, तर आता अॅडम ब्रिटन या ख्रिस्त्याने श्वानावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याउलट हिंदु धर्मात वसुबारसला गायीची, तर पोळ्याला बैलाची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवले जाते ! कुठे मुक्या प्राण्यांप्रती भूतदया दाखवणारा हिंदु धर्म, तर कुठे प्राण्यांकडे भोगवस्तू म्हणून पहाणारे अन्य पंथीय ! यावरून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. |