सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथे पुन्हा एकदा चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. या वेळी एका चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी बिशप (वरिष्ठ पाद्री) यांच्यावर आक्रमण करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात बिशपसह काही जण घायाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Bishop Mar Mari Emmanuel, severely injured in a stabbing attack at the Christ the Good Shepherd Church, in Wakeley, Sydney while delivering his sermon.
This is just days after the Sydney shopping center mass stabbing that killed six.
https://t.co/ubY2dd23dE— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 15, 2024
सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सिडनी अधिकार्यांनी सांगितले. काही दिवसांपूवी सिडनीतील एका व्यापारी संकुलामध्ये ६ जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.
सौजन्य 7NEWS Australia
बिशप मारी इमॅन्युएल वेकले येथील ‘क्राइस्ट द गुड शेफर्ड चर्च’मध्ये संध्याकाळी ७ वाजता प्रार्थना करत असतांना एका व्यक्तीने त्यांच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने अनेक वेळा वार केले. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.