केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवले ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, ‘गोमेकॉ’

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत आता बर्‍याच प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यांना अतीदक्षता विभागातून आता ‘महनीय व्यक्ती’च्या खोलीत हालवण्यात आले आहे,

५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ

राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला २२ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. ही लसीकरणाची मोहीम सलग २ दिवस ७ केंद्रांमध्ये चालणार आहे. प्रतिदिन एका केंद्रात १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर सौम्य ताप, उलटी होणे, ही लक्षणे सर्वसामान्य स्वरूपाची ! – आरोग्य खाते

ही लक्षणे दिसणे म्हणजे ‘लस घेणार्‍याच्या रोगप्रतिकारशक्तीच्या दृष्टीने लस कार्य करू लागली आहे’, असे समजावे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या संचालकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना होणार

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होत आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे.

संशयितांना बंदुकीची विक्री करणार्‍या बिहारस्थित दोघांना जामीन संमत

येथील सुवर्णकार स्वप्नील वाळके खून प्रकरणी प्रमुख संशयितांना बंदूक पुरवणारे बिहारस्थित आरोपी शानी कुमार आणि राहुल कुमार यांची येथील सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांची न्यायालयीन चौकशी करावी !

आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ‘साखळी उपोषण’ चालू आहे.

नाशिक महापालिकेजवळ लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त

शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ पेस्ट कंट्रोल चालू असतांना शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.

सातारा जिल्ह्यातील पहिल्या दहा (टॉप टेन) गुन्हेगारांची यादी सिद्ध ! – शंभूराज देसाई

गंभीर गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी असणार्‍या गुन्हेगारांवर तातडीने मोक्का आणि एम्.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) कारवाई करण्यात येईल.