चालत्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पळवले ५० सहस्र रुपये

शेती कापसाच्या विक्रीतून आलेले ५० सहस्र रुपये बँकेतून काढून नेतांना चोरट्यांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतून ते पळवले. ही घटना चौकातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आणि त्यावरून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

श्री शिवाजी विद्यापिठाच्या उपकेंद्रासाठी ७८ गुंठे भूमीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी 

राज्यसभा खा.छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे श्री शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र होण्यासाठी खावली येथील ७८ गुंठे जमीन वर्ग करण्याविषयी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे आग्रहाची मागणी केली. 

यवतमाळ येथे जन्मत: दोष असणार्‍या बाळांवर उपचार करणार्‍या केंद्राचे उद्घाटन  

या उद्घाटन सोहळ्यात नगराध्यक्ष, जी.प. अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जि.पो. अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आदी गणमान्य उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रसायनयुक्त जुन्या साड्या नदीपात्रात धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या घटकांवर कठोर कारवाई करा ! – करवीर शिवसेना

ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, करवीर विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय घोरपडे यांना देण्यात आले.

कोरोनाचे संकट असल्याने शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करावा !

कोरोनाचे संकट अद्यापही संपूर्णपणे गेलेले नाही. या स्थितीत सण आणि उत्सव सुरक्षित वातावरणात अन् साधेपणाने साजरे करावेत.-अजित पवार

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषदेच्या उपसभापती

केंद्र सरकारने असंघटित कामगारांना वार्‍यावर सोडले आहे.

ध्वजसंहिता डावलून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

करवीरतालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे.