सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

पाटण येथे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) ना. शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिला, तसेच मोलमजुरी करणारे यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सातारा शहरामध्ये शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. महाबळेश्‍वरमध्ये बाळासाहेब ठाकरे चौक येथे शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख राजेश कुंभारे, महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम्. बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.