श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले

महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.

देशात गेल्यावर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते.

रेल्वेकडून ‘आय पे’ सेवा कार्यान्वित

भारतीय रेल्वेने आय.आर्.सी.टी.सी.- आय पे (IRCTC-iPay) नावाची नवीन पेमेंट गेटवे सेवा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे.

तमिळनाडूमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिराची ३५ एकर भूमी कह्यात घेण्यास संमती !

अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उत्पन्न होतात !

उत्तराखंडमध्ये ५८ धरणे प्रस्तावित; मात्र अमेरिकेमध्ये फोडली जात आहेत धरणे !

एरव्ही पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ? धरणांमुळे होणारी हानी लक्षात घेता भारत सरकार धरणांविषयी काय भूमिका घेणार ?

कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २२ वा वर्धापनदिन ‘ऑनलाईन’ पद्धतीने उत्साहात साजरा !

फेसबूक आणि यू ट्यूब यांद्वारे प्रसारित केलेल्या या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.  प्रारंभी पू. रमानंद गौडा यांनी दीपप्रज्वलन केले. तसेच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकांचे प्रकाशन केले.

तुम्ही अब्जावधी डॉलरचे आस्थापन असाल; मात्र लोकांचे खासगी आयुष्य पैशांपेक्षा अधिक महत्त्वाचे !

वापरकर्त्यांच्या माहितीचा व्हॉट्सअ‍ॅप कुठेही वापर करू शकते, हे धोरण ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू होणार होते; मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर हा कालावधी वाढवून १५ मे करण्यात आला आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्‍या औषधी आस्थापनाच्या वैद्यकीय प्रतिनिधीचे सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांच्याकडून प्रबोधन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अ‍ॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून ‘Vital Vitamin for every Valentine’ म्हणजे ‘प्रत्येक प्रेमविरासाठी हे औषध आवश्यकच आहे’, असे विज्ञापन करण्यात आले होते.

देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्‍चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.