सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली !

भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव

सातारा, २४ मार्च (वार्ता.) – ‘हुतात्मादिना’निमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.