सहस्रो शिक्षकांच्‍या दुबार नोंदणीवर कार्यवाही करणार !

राज्‍यामध्‍ये २०२२-२३ पासून सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची आधार वैधतेसह माहिती ‘युडायस प्‍लस प्रणाली’मध्‍ये भरण्‍याची कार्यवाही महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्‍या वतीने चालू आहे.

ज्ञानवापीच्‍या वैज्ञानिक सर्वेक्षणावर ३ ऑगस्‍टला होणार निर्णय !

ज्ञानवापीच्‍या सर्वेक्षणाला जिल्‍हा न्‍यायालयाने अनुमती दिल्‍यानंतर मुसलमान पक्षाने त्‍याविरोधात उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. सर्वेक्षणाच्‍या वेळी खोदकाम होण्‍याच्‍या शक्‍यतेने त्‍याला विरोध करण्‍यात आला आहे.

महाराष्ट्रात आदिवासी आणि मागासवर्गीय यांच्या भूमी लाटणारी टोळी कार्यरत !

अधिकार्‍यांना हाताशी धरून या भूमी हस्तगत करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे.  मागासवर्गियांची ७/१२ नावे असणार्‍या ‘महार वतन भूमी’ आहेत; मात्र त्यांची नावे काढून दुसर्‍याच व्यक्तीच्या नावे त्या भूमी केल्या गेल्या आहेत.

नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

अशा लव्‍ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्‍यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्‍यक असतांना त्‍यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्‍न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !

लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ९ मासानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात.

‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

अनाथ मुलांना उच्च शिक्षणातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सामावून घेऊ ! – आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ मुला-मुलींना शासकीय नोकरीमध्ये १ टक्का आरक्षण दिलेले आहे. त्यांना नोकरीसाठी अनेक सवलतीही देण्यात आलेल्या आहेत, तसेच त्यांना सर्व उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करू.

मणीपूरमध्ये पुन्हा गोळीबार !

मणीपूरच्या थोरबांग आणि कांगवे येथे हिंदु मैतेई समाज अन् ख्रिस्ती कुकी समाज समोरासमोर येऊन पुन्हा गोळीबार आणि हिंसाचार झाला. तत्पूर्वी २६ जुलैला म्यानमारच्या सीमेवर गोळीबार आणि जाळपोळ करण्यात आली.

जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये पाकिस्तान ९९ व्या स्थानावर !

जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये (ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये) पाकिस्तान १२१ देशांच्या सूचीमध्ये ९९ व्या स्थानी गेला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ॲागस्टपर्यंत चालू रहाणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२ आणि ३ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि ४ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाजांचे ठराव होणार आहेत.