मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

पाक आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक असले, तरी दोन्ही आघाड्यांवर आम्ही सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.

कांदळवन अवैधरित्या तोडणार्‍यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’ मध्ये १२ चित्रपट प्रदर्शित होणार

या चित्रपटांमध्ये ‘नाईट ऑफ द किंग्स्’, ‘लव्ह अफेअर्स’ आणि ‘द बिग हिट’ हे फ्रान्समधील चित्रपट दाखवण्यात येतील.  जगभरातील चित्रपटांमधून उत्कृष्ट आणि निवडक असे चित्रपट ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात दाखवण्यात येतात.

मोरेना (मध्यप्रदेश) येथे विषारी दारूमुळे ११ जणांचा मृत्यू

विषारी दारू विकली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ?

कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलसाठी सनबर्न आयोजकांकडून पुन्हा अर्ज दाखल

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोव्यात कोंबड्या आणि अंडी यांच्या प्रवेशास किंवा वाहतुकीस मनाई

दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी दक्षिण गोव्यात  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून कोंबड्या अन् इतर पक्षी आणि त्यांची अंडी यांच्या वाहतुकीस किंवा प्रवेशास एका आदेशाद्वारे मनाई केली आहे.

गोव्यात दिवसभरात ९२ कोरोनाबाधित

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे ९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत जिल्हा शासकीय रुग्णालय !

गत एक तप सातारा जिल्हा रुग्णालयाची अग्नीशामक तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याची गोष्ट समोर आली आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.