संजय राठोड यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप

सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही.

बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूक यांची टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांकडून चौकशी

टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्‍या निकीता जेकब आणि बीड येथील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारी या दिवशी दोघांचीही देहली पोलिसांनी चौकशी केली.

शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

केवळ आम्हीच नाही, तर शिवरायांना मानणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवरायांचा वंशज आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते.

जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत.

एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

एक देशभक्त म्हणून चांगले सरकार देणे, हे माझे काम आहे ! – ई. श्रीधरन्

दिशा रवि अशा गोष्टींमुळे देशाची प्रतिमा मलीन होते याविरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !

झोपी गेलेला हिंदु समाज जागा होईल, त्यावेळी तो सगळे जग प्रकाशमान करील ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आज देशात कुणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदु पूर्वजांचेच वंशज आहेत. कुणी आपल्याला पालटेल याची भीती नाही; पण या गोष्टी आपण विसरून जाऊ, याची भीती आहे.

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?