वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईत खासगी वाहनांवर ‘कलर कोड’ लावणे अनिवार्य ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या वाहनांवर लाल रंग, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे वर्तुळ असणे अनिवार्य असणार आहे.

लालूप्रसाद यादव यांना दुकमा कोषागार प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन संमत

लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत.

केरळ उच्च न्यायालयाकडून ईडीच्या अधिकार्‍यांवरील गुन्हा रहित !

केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवला होता.

महाराष्ट्र शासनाकडून ६ राज्यांना संवेदनशील घोषित

अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना १५ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक

पनवेल येथे नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावरील ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा गोंधळ

पनवेल नगरपालिकेच्या वतीने १९ एप्रिल या दिवशी नवीन पनवेल येथील बांठीया शाळेच्या बाजूला ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र (‘यूपीएच्सी ३’ न्यू पनवेल आरोग्य केंद्र) उभारण्यात आले होते. लसीकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा का ? याची माहिती घेत आहोत ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाच्या मालकांना अन्वेषणासाठी बोलावले होते. पोलिसांवर दबाव टाकणे, हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा का ? याचे अन्वेषण करण्यात येत आहे

निधन वार्ता

सनातनच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सुमन धोंडुपंत मुक्कावार (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

काळा ओढा फुटल्‍याने लाखो लिटर प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत !

पंचगंगा नदी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडईतील घाऊक भाजी विक्री बंद !

सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे.

विश्‍व ब्राह्मण महापरिषद यांच्या वतीने मिरज शहर पोलिसांना थंडगार सरबत वाटप !

या उपक्रमात महाराष्ट्र संघटन मंत्री सौ. प्राची फाटक, जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनघा कुलकर्णी, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. नम्रता साठये  यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.