संभाजीनगर येथे पोलिसांशी बोलतांना चक्‍कर येऊन कोसळल्‍यानंतर सलून चालकाचा मृत्‍यू !

पीरबाजारातील केशकर्तनालयाचे मालक फिरोज खान कदीर खान (वय ५० वर्षे) यांचा मृत्‍यू पोलिसांच्‍या मारहाणीत झालेला नाही, असे ‘सीसीटीव्‍ही’च्‍या चित्रणाच्‍या आधारे केलेल्‍या अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाले आहे.

अवकाळी पावसाचा सहस्रो शेतकर्‍यांना फटका !

कोरोनाशी दोन हात करतांना या वर्षी सहस्रो शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्‍या हानीचा मोठा फटका बसला आहे.नुकत्‍याच झालेल्‍या अवकाळी पावसातील गारपीटीमुळे बागायती क्षेत्र आणि फळपिके यांची हानी झाली आहे.आहे.

धर्मविरोधी विचारांना पायबंद घालत रुई (जिल्‍हा सातारा) येथे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा !

कोरेगाव तालुक्‍यातील रुई या गावी गत २ वर्षांपासून अनेकजण गुढीपाडव्‍याला गुढीऐवजी ध्‍वज उभा करत होते. हिंदु जनजागृती समितीने हिंदूंचे प्रबोधन केले आणि त्‍यांना गुढी उभारण्‍याचे आध्‍यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.

सातारा जिल्‍ह्यातील ‘ऑक्सिजन बेड’साठी ५० लाख रुपयांचा निधी !

जिल्‍ह्यातील विविध आरोग्‍य केंद्रांसाठी ५० लाख रुपयांचे १८० ‘ऑक्सिजन बेड’ उपलब्‍ध होणार आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांच्‍या मागणीवरून पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्‍हा नियोजन समितीमधून ही तरतूद केली आहे.

सरकारी आरोग्‍य संस्‍थांमधील वापरात नसलेले परंतु वापरण्‍यायोग्‍य व्‍हेंटिलेटर्स खासगी रुग्‍णालयांना देण्‍यास हिरवा कंदील !

जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील सरकारी आरोग्‍य संस्‍थांमधील वापरात नसलेले; परंतु वापरण्‍यायोग्‍य असलेले व्‍हेंटिलेटर्स खासगी रुग्‍णालयांना देण्‍यास विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी अनुमती दिली आहे.

पुण्‍यात कोरोनाचे खोटे चाचणी अहवाल देणार्‍या दोघांवर पोलिसांची कारवाई !

कोरोनाच्‍या चाचणीचे बनावट अहवाल देणार्‍या दोघांना पुणे येथील डेक्‍कन जिमखाना पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रस्‍त्‍यावरील एका प्रयोगशाळेच्‍या नावाने बनावट चाचणी अहवाल सिद्ध करून त्‍याची विक्री होत होती.

कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा ! – श्रीराम सेना कर्नाटक (बेळगाव विभाग)

कोरोना महामारीमुळे यंदा श्रीरामनवमी उत्‍सवावर निर्बंध येण्‍याची दाट शक्‍यता आहे. तरी कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन श्रीराम सेनाच्‍या वतीने काढलेल्‍या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

देवगड येथे अवैधरित्या मासेमारी करणारा कर्नाटकचा ट्रॉलर पकडला

ट्रॉलरला मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रॉलर पळून जात होता.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील औषधविक्रेते आणि त्यांचे कामगार यांनाही कोरोनाची लस देण्याची मागणी

कोरोनाची दुसरी लाट आलेली असून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सर्व फार्मासिस्ट आणि त्यांचे कर्मचारी यांना कोविड लस प्राधान्याने मिळावी

मुंबईहून आलेल्या प्रवाशाचे कुडाळ रेल्वेस्थानकात निधन झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे उघड

१८ एप्रिलला दोडामार्ग बाजारपेठेत १, कणकवलीत २ आणि कुडाळ शहरात २ जण, असा ५ जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला.