मिरज, १९ एप्रिल – विश्व ब्राह्मण महापरिषद नारी शक्ती यांच्या वतीने १८ एप्रिल या दिवशी मिरज शहरातील पोलीस बांधवांना थंडगार सरबत वाटप करण्यात आले. यात शास्त्री चौक, लक्ष्मी मार्केट चौक, बॉम्बे बेकरी चौक, आळतेकर हॉल अशा ठिकाणी हे वाटप करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र संघटन मंत्री सौ. प्राची फाटक, जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनघा कुलकर्णी, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. नम्रता साठये यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. या उपक्रमास पुरुष विश्व ब्राह्मण महापरिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. नीलेश साठये आणि उपाध्यक्ष श्री. भास्कर कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.