वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईत खासगी वाहनांवर ‘कलर कोड’ लावणे अनिवार्य ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई – मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी खासगी वाहनांवर ‘कलर कोड’ लावणे अनिवार्य केले आहे. यामध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या वाहनांवर लाल रंग, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांच्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे वर्तुळ असणे अनिवार्य असणार आहे. ‘कलर कोड’चा दुरुपयोग केल्यास ४१९ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

याचा परिणाम म्हणून १९ एप्रिल या दिवशी वाशी पथकर नाक्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची संख्या नेहमीपेक्षा अल्प पहायला मिळाली.