केरळ उच्च न्यायालयाकडून ईडीच्या अधिकार्‍यांवरील गुन्हा रहित !

केरळमधील सोन्याच्या तस्करीचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळ) – अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रहित करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. या अधिकार्‍यांनी आरोपींना सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणी मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांचे नाव घेण्याचा दबाव टाकल्याचे या गुन्ह्यात म्हटले होते.

(केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून असेच लक्षात येते की, केरळ सरकारने दबाव टाकल्यामुळेच केरळ पोलिसांनी ईडीच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाचीच आता चौकशी केली पाहिजे ! – संपादक)