कुपोषणावरील उपाययोजनांचा अहवाल राज्यपाल कार्यालयात ६ वर्षांपासून धूळ खात पडून !

राज्यात सर्व यंत्रणा हाताशी असूनही आणि प्रतिवर्षी आदिवासी समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये व्यय होऊनही कुपोषणाची समस्या न सुटणे प्रशासनाला लज्जास्पद !

शासकीय कामकाजात मराठीच्या अधिकाधिक वापरासाठी राज्यशासन धोरण निश्‍चित करणार !

‘मराठी भाषा सल्लागार समिती’ची मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये मराठी भाषेचे संवर्धन आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याविषयी सर्वंकष धोरण लवकरच घोषित करण्याचे निश्‍चित करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सावरकरवाड्यात मांडली जाणार वीरगाथा !

तंत्रज्ञानाचा संपूर्ण वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास नव्या पिढीला दाखवावा. भगूर या गावात प्रवेश करताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा, असे काम करण्याची सूचना या वेळी मुनगंटीवार यांनी अधिकार्‍यांना दिली.

श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानकच नाही !

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुसज्ज अशी बसस्थानके आहेत; मात्र श्रीक्षेत्र गोंदवले येथे बसस्थानक नसल्यामुळे प्रवासी, भाविक, महिला आणि बालके यांना रस्त्यावरच एस्.टी.च्या गाडीची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते.

कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद याचा मुलगा असद हा पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यासह गुलाम नावाच्या गुंडही मारला गेला आहे.

गेल्या ३ मासांत पणजी शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ

रस्त्याचे बांधकाम चालू असणे, इमारती पाडण्याचे काम चालू असणे, आगीचा धूर, वाहनांतून सोडण्यात येत असलेली प्रदूषित हवा आदी कारणांमुळे ‘पी.एम्.१०’ची मात्रा वाढली आहे.

पणजी येथील वाहतूक कोंडीची न्यायालयाने स्वतःहून घेतली नोंद

पणजी शहराची ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास शहराची काय दुर्दशा होईल ? याचा अंदाज लावणे कठीण आहे. सद्यःस्थिती पहाता ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याविषयी शंका निर्माण होत आहे.

सातार्‍यात ७ जणांच्या टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई !

सातारा आणि पुणे जिल्ह्यांत गंभीर गुन्हे करणार्‍या सातारा जिल्ह्यातील ७ जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यातील उंब्रज, कराड शहरांसह पुणे जिल्ह्यातील निगडी आणि भारती विद्यापीठ परिसरातील पोलीस ठाण्यांत ७ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना ‘ईडी’ची क्लीन चिट ?

अजित पवार यांचे ‘ईडी’च्या आरोपपत्रात नावच नाही ! पुढील सुनावणी १९ एप्रिलला !