समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध ! – माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

भाजप घटनेत पालट करत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करते; मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ७३ वेळा घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत.

सावदा (जिल्हा जळगाव) येथे श्रीरामनवमीनिमित्त भव्य पालखी सोहळा आणि महाप्रसाद !

सावदा येथे श्रीरामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून येथील प्रभु श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही.

संवर्धनानंतर श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली !

संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत् खुले करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.

Mumbai HC Ram Navami : रामनवमीनिमित्तच्या यात्रांमुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या !

उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना आदेश !

लग्नाआधी एकत्र राहिल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो ! – अभिनेत्री मुमताज

अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच देशातील तरुण-तरुणींना विवाहाआधी ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्याविषयी विधान केले होते. ‘हे संबंध सुधारण्याची आणि चाचणी करण्याची संधी देते ’, असे त्यांनी म्हटले होते.

देश आर्थिक प्रगती करत असला, तरी गरिबी मोठे आव्हान ! – डी. सुब्बाराव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर

भारत सध्या जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे; परंतु दरडोई उत्पन्न केवळ २ सहस्र ६०० डॉलर (२ लाख १७ सहस्र रुपये) आहे. समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की, अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास या दोन भिन्न गोष्टी आहेत.

निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या; युवतीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद…

ऑनलाईन शिकवणीवर्गाच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने येथील युवतीला शीतपयेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे ध्वनीचित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘स्वमग्न’ (गतीमंद) मुलांसाठी विशेष शाळा चालू होणार

‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे लागत होते; मात्र आता जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.