
कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – संभाजीनगर येथील पुरातत्व रसायनतज्ञ विभाग यांनी १२ आणि १३ एप्रिलला पहाणी करून १४ अन् १५ एप्रिलला श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधीक्षक डॉ. एस्. विनोदकुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली. संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत् खुले करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पूर्ववत झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)