जून २०२४ पासून मुंबई विद्यापिठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू होणार !

मुंबई विद्यापिठाचा स्तुत्य प्रयत्न ! मंदिराप्रमाणेच हिंदु धर्माशी निगडीत विषयांच्या संदर्भातही अभ्यासक्रम चालू व्हावा, ही हिंदूंची अपेक्षा !

देशात ‘एन्.डी.ए.’ला चांगले वातावरण असून ४०० पेक्षा अधिक जागांवर यश मिळेल ! – चंद्राबाबू नायडू

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आनंद झाला. देशात शांती नांदावी, या देशातील सर्वांना श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली.

आणखी २ दिवस राज्यात उष्णतेची लाट !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम रहाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.

अकोला येथे १ कोटी रुपयांसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणार्‍या ५ जणांना अटक !

शहरातील प्रसिद्ध व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा यांचे १ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहरण करणार्‍या आरोपींचा ५० घंट्यांत छडा लावला.

मतदान करणार्‍यांना उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत !

मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवल्यावर मुंबईतील १०० हून अधिक उपाहारगृहांमध्ये जेवणाच्या दरात २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. २० आणि २१ मे हे २ दिवस ही सवलत देण्यात येणार आहे.

योग्य जीवनशैली आणि योग्य आहार हेच औषध ! – वैद्य सुविनय दामले

भारतीय आयुर्वेद पद्धतीमध्ये प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा विचार करून जीवन जगण्याची पद्धती निर्माण केली आहे. भारतीयत्व जोपर्यंत आपल्या अंगात भिनत नाही, तोपर्यंत आपल्याला संपूर्ण आरोग्य मिळणार नाही.

सोलापूर शहरात गेल्या २ महिन्यांत ५०० हून अधिक चोरीच्या घटना !

शहरातील वाढत्या चोर्‍यांना पोलीस प्रशासनाला उत्तरदायी ठरवून त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक !

मुंबई पोलीस दलातील ९० पोलीस हवालदारांना पदोन्नती !

मुंबई पोलीस दलातील ९० पोलीस हवालदारांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर ११३ पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिली आहे.

कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा !

कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना महापलिकेच्या वतीने नोटिसा देऊन ती तात्काळ हटवण्यास सांगण्यात आले आहे.

नाशिक येथे दुचाकींची जाळपोळ

जुने नाशिक परिसरात ३ अज्ञातांनी ७ – ८ दुचाकींची जाळपोळ केली. त्यांनी चेहरे झाकले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाली आहे.