सोलापूर – १ मार्च ते १२ मे या कालावधीत ५०० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये जुळे-सोलापूर, विडी घरकूल आणि अक्कलकोट रोड या भागांत घरफोडीचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर फौजदार चावडी, सदर बझार, जोडभावी पेठ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण लक्षणीय आहे. यांपैकी काही गुन्ह्यांतील चोरट्यांचा काही घंट्यात शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी चोरीच्या घटना सतत वाढत आहेत. त्यामुळे सर्वाधिक चोरी, घरफोडी ज्या भागात होतात, त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी नियमित काही घंटे गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (अशी मागणी का करावी लागते ? अशी उपाययोजना पोलीस स्वतःहून का काढत नाहीत ! – संपादक)
संपादकीय भूमिकाशहरातील वाढत्या चोर्यांना पोलीस प्रशासनाला उत्तरदायी ठरवून त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक ! ‘चोरांचे शहर असलेले सोलापूर’ अशी सोलापूर शहराची प्रतिमा न होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक ! |