कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा !

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील १७ विनापरवाना, अनधिकृत होर्डिंग्जधारकांना महापलिकेच्या वतीने नोटिसा देऊन ती तात्काळ हटवण्यास सांगण्यात आले आहे. घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंग्जची पडताळणी करण्याचे आदेश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी प्रशासनास दिले होते. त्याप्रमाणे शहरांतर्गत लावण्यात आलेल्या होर्डिंग्जच्या सुरक्षेविषयी उपायुक्त साधना पाटील यांनी  ‘होर्डिंग्ज असोसिएशन’चे पदाधिकारी आणि होर्डिंग्जधारक यांच्या समवेत बैठक घेतली. यानंतर या नोटिसा देण्यात आल्या, तसेच शहरातील २ होर्डिंग्ज निष्कासित करून ते तात्काळ काढून टाकण्यात आले.