मुंबई – मुंबई पोलीस दलातील ९० पोलीस हवालदारांना पदोन्नती देण्यात आली आहे, तर ११३ पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती दिली आहे.
१. लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत ही पदोन्नती करण्यात आल्याने निवडणूक आयोगालाही या संदर्भात महिती देण्यात आली आहे.
२. स्थानांतराच्या आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकार्यांना बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही, याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
३. आदेशानंतर जे पोलीस अधिकारी अनुपस्थित रहातील, त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा, असे आदेशात म्हटले आहे.