‘घराबाहेर पडू नको’ असे सांगितल्यामुळे भावाची हत्या
देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.