रत्नागिरीतील काही गावांत कुणालाही प्रवेश न देण्याचा निर्णय : गावकर्‍यांनी स्वत:हून केले ‘क्वारंटाईन’

रस्त्यावर चिरे, दगड, मातीचा भराव किंवा बांबू बांधून रस्ते अन् वाटा केल्या बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा चालू

२२ मार्चपासून बंद असलेली मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा कोकण आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मध्यस्थीनंतर २६ मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर चालू करण्यात आल्या.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातनचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला. गेले काही मास ते वाकण (जिल्हा रायगड) येथे त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास होते.

सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करणार्‍या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण

येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.

सहकार्य न करणार्‍यांवर लाठीचा उपयोग करण्यात येईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे वाहनांना मर्यादित इंधन

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्‍यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्‍यांची संख्या अधिक आहे.

महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे फकिर महंमद हुसेन नेवरेकर यांच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

खासगी वाहनांच्या बंदी आदेशाविषयी माहिती देणार्‍या एका महिला पोलीस कर्मचार्‍याशी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडल्याची घटना लांजा येथे घडली.

यवतमाळ जिल्ह्यात २ दिवसांत ३८ जणांवर फौजदारी गुन्हा नोंद

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्‍या ३८ जणांवर २२ आणि २३ मार्च या दिवसांमध्ये फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला. विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभानिमित्त म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातनच्या रामनाथी गोवा आणि देवद पनवेल येथील आश्रमात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण करण्यात आले.