महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे फकिर महंमद हुसेन नेवरेकर यांच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

सरकारने महिला पोलिसांवर हात उचलणार्‍या अशा उद्दाम आणि कायदाद्रोह्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहातच डांबायला हवे !

रत्नागिरी – खासगी वाहनांच्या बंदी आदेशाविषयी माहिती देणार्‍या एका महिला पोलीस कर्मचार्‍याशी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडल्याची घटना लांजा येथे घडली. या प्रकरणी शहरातील फकिर महंमद हुसेन नेवरेकर यांच्यावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. लांजा बाजारपेठेत शेट्ये इमारतीसमोर वाहनांची पोलीस तपासणी करत असतांना लांजा बसस्थानकाच्या दिशेने जाणार्‍या खासगी स्विफ्ट कारचे (एम्.एच्.०६, ए एक्स – १२१२) चालक फकिर महंमद हुसेन नेवरेकर यांना लांजा पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी सुगंधा हरेष दळवी यांनी थांबवले.

२. याचा राग येऊन नेवरेकर यांची सुगंधा दळवी यांच्याशी वाद घातला, तसेच त्यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना रस्त्यावर खाली पाडले. यानंतर कर्तव्य बजावत असलेले अन्य पोलीस कर्मचारीही त्या ठिकाणी धावून आले. या घटनेची फिर्याद स्वतः महिला पोलीस सुगंधा दळवी यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली.

३. या फिर्यादीनंतर फकिर महंमद नेवरेकर यांच्यावर भा.दं.वि.क. १५३, १५२, ३५२, ३३२, २९४, १८८, २७९, २७०, २७१ व्यवस्थापन कलम ५१ (ब) साथ रोग अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(संदर्भ : ‘पुढारी’ वृत्तसंकेतस्थळ)