समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना दिला पुरस्कार

केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.

आदि शंकराचार्यांनी पंचायतन पूजा, कुंभमेळा आणि आखाडा यांची निर्मिती केली ! – व्याख्याते श्रीनिवास पेंडसे  

या कार्यक्रमात नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारण केले. यामुळे चर्चासत्राला एक आध्यात्मिक आणि मांगल्याचा स्पर्श झाला होता.

देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा असल्याचे सांगत धर्मांधाने केला अल्पवयीन हिंदु मुलीवर अत्याचार !

एखादा धर्मांध जेव्हा देश ‘गजवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे म्हणत अत्याचार करत असेल, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल अन्वेषण करून धर्मांधांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !

पोटात कोकेनच्या ७४ कॅप्सूल्स लपवणार्‍या आफ्रिकन अमली पदार्थ तस्कराला अटक !

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका आफ्रिकन अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची पुन्हा चौकशी होणार !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर १ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

थकबाकी शून्य करा आणि अखंडित वीज सेवेसाठी यंत्रणा अद्ययावत् ठेवा ! – अरविंद भादीकर, नूतन संचालक, महावितरण

पुरेशा दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्रातील यंत्रणा अद्ययावत् ठेवा, वेळोवेळी रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती करा, अशा सूचना ‘महावितरण’चे नूतन संचालक अरविंद भादीकर यांनी सातारा क्षेत्रीय भेटीमध्ये केल्या.

लाच घेणार्‍या पीएच्.डी. मार्गदर्शकावर पुणे विद्यापीठ कारवाई करणार !

असे लाचखोर प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय घडवणार ? त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचीही चौकशी केली पाहिजे !

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदानाच्या दिनांकांपूर्वी संबंधित मतदारसंघात या सभा होणार आहेत. सभांचे दिनांक लवकरच भाजपकडून घोषित करण्यात येणार आहेत.

वर्ष २०१४ च्या तुलनेत विदर्भात १० लाख ९८ सहस्र मतदार वाढले !

निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती.

सोलापूर येथे अवैध वाळूउपसा करणार्‍यांवर कारवाई !

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तसेच महसूल पथकाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.