६६ लाखांचा मुद्देमाल जप्त !
सोलापूर – करमाळा तालुक्यातील ढोकरी गावातील उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अवैधरित्या वाळूउपसा करणार्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सोलापूर आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई करत ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत बोट मालकासह एकूण ६ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांपैकी रबिऊल शेख, आमीर शेख, युसुफ शेख (सर्व रहाणार गुहिटोला, ठाणा राधानगर, जिल्हा साहेबगंज, झारखंड) यांना कह्यात घेतले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तसेच महसूल पथकाचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.