समाना दा कल्चुरा इंडो पोर्तुगिजा (गोवा) या पोर्तुगीजधार्जिण्या संस्थेच्या वतीने पणजी येथे आजपासून पोर्तुगीज चित्रपट महोत्सव

समाना दा कल्चुरा इंडो पोर्तुगिजा (गोवा) या पोर्तुगीजधार्जिण्या संस्थेने पणजी येथे २२ सप्टेंबरपासून पोर्तुगीज चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे.

मोरजी समुद्रकिनार्‍यावरील रशियन भाषेतील सूचना फलक हटवा !

मोरजी समुद्रकिनार्‍यावरील रशियन भाषेतील सूचना फलक हटवा, अशी मागणी मोरजी येथील नागरिकांनी स्थानिक पंचायत आणि प्रशासन यांच्याकडे केली आहे.

नारायण राणे यांचे काँग्रेस पक्षासह विधान परिषदेच्या सदस्यत्वाचेही त्यागपत्र

काँग्रेसने माझा वापर करून घेतला. मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्‍वासन देऊन वारंवार मला हुलकावणी देण्यात आली.

गोव्यातील सनातनच्या साधकाविषयी पोलिसांकडून त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी

गोव्यातील एका गावातील सनातनच्या साधकाविषयी १९ सप्टेंबरला पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. गोव्यातील २ पोलीस आणि परराज्यातील २ पोलीस, असे ४ पोलीस साधकाच्या घरी गेले होते.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर पुन्हा अडचणीत !

आमदार बाबू कवळेकर यांनी साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली आहे.

गोव्यात नाताळच्या सुटीत कला आणि संगीत महोत्सव न घेण्याकडे शासकीय समितीचा कल

समितीच्या २० सप्टेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पिसुर्ले (डिचोली, गोवा) येथील गोवंशियांच्या तस्करीत महाराष्ट्रातील टोळी कार्यरत असल्याचा संशय

पिसुर्ले येथे काही दिवसांपासून शेतकर्‍यांची गुरे अचानक गायब होत आहेत. या प्रकारामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील एक टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम वाहतूक, वीजपुरवठा आणि दूरध्वनी यंत्रणा यांवर झाल्याने  जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती-बागायतींमध्ये पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचीही हानी झाली आहे.

कोकण रेल्वेच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही ! – सुरेश प्रभु, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

रेल्वेच्या झालेल्या अपघातांचे दायित्व स्वीकारून रेल्वेमंत्रीपदाचे मी त्यागपत्र दिले. पंतप्रधानांनी माझा सन्मान राखून तेवढ्याच तोलामोलाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय दिले आहे. रेल्वेमंत्री असतांना कोकण रेल्वेच्या विकासासाठी मी झुकते माप दिले. या कालावधीत हाती घेतलेल्या प्रकल्पांवर माझ्या त्यागपत्रामुळे कोणताही परिणाम होणार नाही.

घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसला धक्का देणार  ! – नारायण राणे

देहली असो वा महाराष्ट्र सर्व काँग्रेसवाले मला घाबरतात. भविष्यात काँग्रेसला धडा शिकवणार. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सर्व नेते मला हरवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले; मात्र त्यांना शक्य झाले नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे. मी राजकारण सोडणार नसून शेवटपर्यंत राजकारणात रहाणार.


Multi Language |Offline reading | PDF