बनावट कागदपत्रांद्वारे भूमी बळकावल्याची दक्षिण गोव्यात एका दशकात अनेक प्रकरणे !

दक्षिण गोव्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या अनेक घटना गेल्या एका दशकात घडल्या आहेत. याद्वारे अनेक हेक्टर भूमी बळकावण्यात आली आहे.

१० सहस्रांहून अधिक साधकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा दिव्य ब्रह्मोत्सव !

श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा प्रतिवर्षी साजरा होणारा जन्मोत्सव ही साधकांसाठी अनमोल पर्वणी असते ! प्रतिवर्षी श्रीगुरूंचे जे मनोहारी दर्शन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होते, ते भावदर्शन यंदा प्रत्यक्ष घडणार असल्यामुळे साधक डोळ्यांत प्राण आणून गुरुदेवांची वाट पहात होते !

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमात पार पडला चंडी याग !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ब्रह्मोत्सव सोहळ्यानंतर १४ आणि १५ मे या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चंडी याग करण्यात आला. या यागात सप्तशतीचे पाठ करत आहुती देण्यात आली.

येणार्‍या भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणारे ब्रह्मोत्सव सोहळ्याचे व्यवस्थापन आणि सनातनच्या साधकांनी घडवलेले स्वयंशिस्तीचे दर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटात साजरा केला होता. गुरुदेवांचाही असा भव्य जन्मोत्सव साजरा करावा’, अशी सनातनच्या साधकांची मनोमन इच्छा मागील अनेक वर्षांपासून होती, ती या जन्मोत्सवामुळे पूर्णत्वास गेली !

एल्.ई.डी. मासेमारीविषयी अभ्यास करून अनुमती दिली जाईल ! – केंद्रीय मत्सोद्योग मंत्री रूपाला

‘‘एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी करण्याला जी बंदी आहे ती उठवावी, अशी मागणी आहे. याविषयी इतर देशांमध्ये एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी केली जाते का ? याचा अभ्यास केला जाईल. तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टीने त्याचा अभ्यास करून निर्णय दिला जाईल.’’

गोवा : १५ वर्षे जुनी असलेली १ लाख ९२ सहस्र वाहने कालबाह्य ठरणार !

गोव्यात सध्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी असलेली जवळजवळ १ लाख ९२ सहस्र वाहने असून ती भंगारात काढण्यायोग्य आहेत. भंगारात काढल्या जाणार्‍या वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी असलेली वाहने अधिक प्रमाणात आहेत.

शेतकर्‍यांना प्रलंबित थकबाकी आणि अनुदान लवकरच संमत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

१९ ते २१ मे २०२३ या कालावधीत हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कृषी योजना आणि नवीन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यांविषयी शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे.

गोव्‍यात प्रथमच ‘सी २०’ परिषदेचे आयोजन !

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या ‘सिव्‍हिल २०’ परिषदांतील धोरणे आध्‍यात्‍मिक दृष्‍टीकोनांचा अवलंब करून बनवावीत, अशी सूचना केली आहे. भारतातील ‘सिव्‍हिल २०’ परिषदेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्‍या संस्‍थापिका प.पू. माता अमृतानंदमयी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

गोवा : अनमोडमार्गे कर्नाटकात प्रवेश करणार्‍या वाहनांना प्रवेश शुल्क आकारणी

अवजड वाहनांसाठी ५० रुपये, तर हलक्या चारचाकी वाहनांसाठी २० रुपये आकारले जात आहेत. अनमोड तपास नाक्यावर हे शुल्क भरावे लागत आहे.

गोव्यात ‘स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे’ १ जूनपासून कार्यान्वित होणार ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतूक विभाग ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’द्वारे टीपलेल्या नियमांच्या उल्लंघनासाठी ‘ई-चलन’ काढणार आहे. हे ‘ई-चलन’ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याला थेट त्याच्या भ्रमणभाषवर पाठवले जाणार आहे.