
पणजी, २३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या ३ आठवड्यांपूर्वी प्रभागांच्या आरक्षणाविषयी सूची घोषित करणार असल्याची माहिती गोवा शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शासनाचे हे म्हणणे मान्य केले आहे. न्यायालयाने संबंधित संस्थांना त्या अनुषंगाने कृती करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरपालिकांची निवडणूक घोषित करायच्या १ मास पूर्वी नगरपालिकांच्या प्रभागांची फेररचना करणे किंवा प्रभागांचे आरक्षण करणे, यांविषयीचे निर्णय शासनाने घोषित करण्याची मागणी याचिकादाराने न्यायालयाकडे केली होती. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा