काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

अहमद पटेल ३ वेळा लोकसभेचे, तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते.

देहलीमध्ये बुरखाधारी महिलेकडून दुकानदाराशी झालेल्या वादातून गोळीबार !

एका बुरखाधारी धर्मांध महिलेकडेही आता पिस्तुले असतात आणि ती गोळीबार करते !

भारत सरकारकडून ‘स्नॅक व्हिडिओ’सहित ४३ अ‍ॅप्सवर बंदी

केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तर मुलगा घायाळ !

देहलीमधील पोलीस खाते केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही !

आज पंतप्रधान मोदी यांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कोरोनावरील लस यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २४ नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महाराष्ट्रासह ४ राज्यांना अहवाल सादर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती सिद्धता केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते.

प्रत्येकाला औषध लिहून देण्याची अनुमती देता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

आयुषच्या डॉक्टरांना केंद्र सरकारने संमत केलेले मिश्रण आणि गोळ्या रुग्णाने घेण्यासाठी लिहून देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या अनुमतीच्या विरोधातील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा निर्णय दिला.

पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत ! – गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर

आझाद यांनी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळवण्याची आशा आता सोडून देऊन तिचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी पुरेसे आहे, असेच जनतेला वाटते !

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतातील कट्टरतावादाच्या तपासणीच्या अभ्यासाला मान्यता यू.ए.पी.ए. कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचीही सूचना

हा अभ्यास जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र आणि केरळ अशा ४ राज्यांत केला जाईल. या राज्यात कट्टरतावादाची बहुसंख्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

देहलीमध्ये कोरोनामुळे होणार्‍या वाढत्या मृत्यूंमुळे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानामध्ये जागाच नाही !

देहलीमध्ये कोरोनामुळे १ सहस्र ४०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक मृतदेहांना स्मशानामध्ये जागा नसल्याने अंत्यसंस्कारापासून थांबवून ठेवण्यात आले आहे.