चीनमध्ये १३ व्या शतकातील मशिदीचे नवीन बांधकाम पाडण्याला स्थानिक मुसलमानांचा विरोध

चीनमधील यूनान प्रांतातील नागू भागातील नाजियिंग मशिदीचे घुमट पाडण्याला स्थानिक मुसलमानांनी विरोध केला. गेल्या आठवड्यात चीनच्या पोलिसांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला स्थानिक मुसलमानांकडून विरोध करण्यात आला.

हिंदी महासागरात मासेमारी करणारी चीनची नौका उलटून ३९ लोक बेपत्ता

हिंदी महासागराच्या मध्यभागी मासेमारी करणारी चीनची नौका उलटल्याने त्यावरील ३९ लोक बेपत्ता झाले आहेत.

चीनमध्ये अमेरिकेच्या नागरिकाला हेरगिरीच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

चीनने अमेरिकेच्या ७८ वर्षीय नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमेरिका आणि हाँगकाँग यांचे नागरिकत्व असलेेले जॉन शिंग-वान लेयुंग यांना चीनच्या सुझोऊ शहरातून १५ एप्रिल २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती.

चीनकडून कैलास मानसरोवर यात्रेचे शुल्क दुप्पट !

हा चीनचा हिंदुद्वेष असून सरकारने तात्काळ याचा निषेध करून हे वाढीव शुल्क रहित करण्यासाठी चीनवर दबाव आणला पाहिजे !

चीन ऑनलाईन मंचांवरून हटवत आहे त्याच्या देशातील गरीबीविषयीचे व्हिडिओ !

चीनमध्ये गरीबी आहे, या संदर्भातील व्हिडिओ ऑनलाईन मंचांवरून हटवला जात आहे. यामागे चीन सरकार आहे, असा दावा आहे. सरकार देशातील गरीबी जगाला दाखवू इच्छित नाही, असे सांगितले जात आहे.

चीनमध्ये नोकरी आणि मनःशांती यांसाठी मंदिरात जाणार्‍या तरुणांच्या संख्येत वाढ !

‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे संबोधणार्‍या साम्यवाद्यांचा अड्डा असणार्‍या चीनमधील तरुणांना मंदिरात मनःशांतीसाठी जावे लागते, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

दारुचे व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीच्या मेंदूत बसवली ‘चीप’ !

मुळात मनुष्य व्यसनाच्या आहारीच जाऊ नये, यासाठी विज्ञानाकडे उपाय नाही ! ती क्षमता अध्यात्मात आहे. त्यासाठीे मनुष्याला साधना करणे क्रमप्राप्त आहे !

(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !

आम्ही युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी रशियाला शस्त्रे देणार नाही ! – चीन

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी निवेदनात म्हटले की, रशियाला पाठवलेल्या त्या वस्तूंवरही बंदी घालण्यात येईल, ज्यांचा वापर नागरी आणि सैनिकी दोन्हींसाठी करता येईल. चीनला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे.