(म्हणे) ‘भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर दक्षिण गोलार्धात उतरले ! – चीन

चीनची ‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून टीका !

ओयांग जियुआन

बीजिंग (चीन) – भारताचे ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दक्षिण धुव्रावर यशस्वी उतरल्यानंतर भारत असा करणारा पहिला देश बनला. जगभरात भारताचे कौतुक करण्यात आले; मात्र यावरून आता चीनने टीका केली आहे. चीनने आरोप केला आहे की, भारताचे चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही.

चीनच्या चंद्रमोहिमेचे संस्थापक ओयांग जियुआन यांनी म्हटले की, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नाही, तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरले आहे. भारताचा रोव्हर ६९ अंश दक्षिण अंशांशावर उतरला आहे. हा चंद्राचा दक्षिण गोलार्ध आहे. दक्षिण धुव्र ८८.५ ते ९० अंशांच्या दरम्यान आहे. चंद्राचा कल पृथ्वीपेक्षा खूपच लहान आहे. त्यामुळे चंद्राचा दक्षिण धुव्रदेखील ८८.५ ते ९० अंशांमध्येच आहे.

संपादकीय भूमिका 

चीनला भारताची प्रगती पाहून पोटदुखी झाल्याने तो अशा प्रकारची टीका करत आहे, हेच लक्षात येते !